व्हेज: भरलेले वांगे, शेव भाजी, फ्लॉवर – बटाटा रस्सा, मिसळीचा कट, छोले, मटार व सर्व प्रकारच्या उसळी तसेच अन्य सर्व रस्सा भाज्या
नॉन व्हेज: अंडा करी, चिकन किंवा मटण रस्सा / मसाला / हंडी, कोळंबी व फिश करी
ओला मसाला घटक पदार्थ: ओला नारळ, सुके खोबरे, तीळ, कांदा, धने, कोथिंबीर, लसूण , आलें, जिरे, काजू, मगज बी, लवंग, काळी मिरी, चक्रफूल, वेलची, खसखस, दालचिनी, तमालपत्र
सविस्तर कृती:
भाजी बनविण्याआधी डीप फ्रीज मधील ओला मसाला बाहेर काढून नॉर्मल होण्यासाठी १०–१५ मिनिटे पाण्यात ठेवावा.
कढई मध्ये तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करून घ्यावी.
नंतर त्यात ओला मसाला घालून तेलावर परतून घ्यावा.
त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तिखट व मीठ घालावे. नंतर तुमची भाजी टाकून या मिश्रणात परतून घ्यावी.
भाजी तयार झाल्यावर वरून ओला नारळ व कोथिंबीर घालून सर्व करावी.
टीप: आवश्यक असल्यास फोडणीमध्ये कांदा व टोमॉटो घालावा. तसेच तुमच्या चवीनुसार कांदा लसूण मसाला, गरम मसाला, आलं – लसूण पेस्ट सुद्धा घालू शकता.
थोडक्यात कृती:
१. तेल + फोडणी + तिखट + मीठ + ओला मसाला + वांगी = भरलेले वांगे तयार
२. तेल + फोडणी + तिखट + मीठ + ओला मसाला + मटार / छोले / मटकी = उसळ तयार
३. तेल + फोडणी + तिखट + मीठ + ओला मसाला + शेव = शेव भाजी तयार
४. तेल + फोडणी + तिखट + मीठ + ओला मसाला + उकडलेली अंडी = अंडा करी तयार
५. तेल + फोडणी + तिखट + मीठ + ओला मसाला + चिकन किंवा मटण = चिकन किंवा मटण रस्सा / मसाला / हंडी तयार
[title]काही उपयुक्त टिप्स [/title]
# ओला मसाला व ओला नारळ नॉर्मल होण्यासाठी पातेल्यात पाणी घेऊन १०-१५ मिनिटे त्यात ठेवावा.
# ओला मसाला तिखट व मीठ विरहित आहे.
# डीप फ्रीजमध्ये, ओला मसाला ३० दिवस व ओला नारळ ६० दिवस टिकतो.